तुझ्या कवेत
आसमंत भरभरून मिळतं सुख
सागराच्या असंख्य लाटा उचंबळून येतात
मनात कुठेतरी खोलवर
अन
शब्दांचे बांधही रोखू शकणार नाही
अश्या अनावर भावना शब्दाळतात
तुझ्याच शब्दासाठी
तुझा एक शब्द
कानावर पडतो
... मनात दिव्यांची रांग उजळवीत जातो
तुझे स्मित
... बगिचाभर कळ्यांच्या पाकळ्या
मैदानांना झाकून जाव्यात
- अंथरुणही तेच अन पांघरुणही तेच
अन मीही हळुवार स्वप्नाळत जातो
तुझ्या स्वप्नात मी आल्याचे माझ्या स्वप्नात पाहतो
डोळे उघडल्याशिवाय कळणार कसे
की तुझ्या कवेत आसमंत भरभरून मिळणारं सुख
स्वप्नातच आपलं आहे
माझ्या निद्रिस्त वेळी तू माझी आहेस
अन माझे नेत्र खुलताच
मी तुझा
तू नाचवावे मला दोऱ्यांनी
मी नाचेलही कळसूत्री बाहुल्यासारखा
कारण
सागराच्या असंख्य लाटा उचंबळून येतात
मनात कुठेतरी खोलवर
अन
शब्दांचे बांधही रोखू शकणार नाही
अश्या अनावर भावना शब्दाळतात
तुझ्याच शब्दासाठी!
- आशिष भोजने
Comments