Ashish Bhojane
नि:शब्द
तुझ्या विरहात
मी हतबल अन गतकातर
पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर डोळे लावून
तुझ्या हाकेला ओ देण्यासाठी
आसुसलेला बसलोय.
थांबलोय पण संपलेलो नाही... इतकंच!
कधी जमलंच तर पहा
तुझ्या वर्तमानाचं कुंपण ओलांडून
मी तिथेच थेंबे थेंबे विरघळतोय भूतकाळात
ती वाट, ते वडाचं झाड आणि मी
सध्या तरी तिथेच आहोत
काहीसे ओसाड आणि बरेच भग्न
तिघेही नि:शब्द
अन तुझ्याच विचारात मग्न
- आशिष भोजने