शब्द शब्दांचे
शब्दांसाठी शब्दाळतात
तेव्हा शब्द झालेला मी
शब्द झालेल्या तुझ्यासाठी
शब्दातून शब्दण्याचा
शाब्दिक प्रयत्न करतो.
मी तुझ्या मौनातील शब्द
शब्दात बांधण्याचा छंद ठेवतो
पण तुला माझं मौनच आवडतं...
कदाचित तुझ्या शाब्दिक शब्दांना
माझ्या मौनातून शब्दणाऱ्या
शब्दांचाच आधार वाटत असावा.
कदाचित म्हणूनच,
मी ही माझे शब्द
थिजवण्याचा प्रयत्न करतोय
पण बघ... माझं मौन
खूप काही बोलतंय... ...
- आशिष भोजने
Comments