Ashish Bhojane
संवेदना
रंग छंद
तुझ्या अदा
... मी फ़िदा
लोभस लाघवी
तुझे स्मित
... मी विस्मित
चपखल चंचल
तुझी चाल
... मी बेहाल
मोहक राजस
तुझे रूप
... सदा सन्मुख
भेदक मारक
तुझा विरह
... जीवाचा दाह
मी हसता
तुझं हसणं
... माझं असणं
तू नसता
माझं हसणं
... माझं कुठेच नसणं
- आशिष भोजने