आठवतं मला अश्रू माझे
मलाच कसे पारखे झाले
झुरलो एकांती त्यांच्यासाठी
अन ते तुझ्या पुढ्यात आले
माझ्या जखमा वाहवेना
मीच खपली काढताना
तू दिसताच कसे माझे
गोठलेले रक्त वाराप्याले
हृदयीच्या कोंदणात म्हणे
माझाच जीव कोंडून आला
जीवात तुझा जीव कोंदून
हृदय माझे अलंकार ल्याले
क्षणांपासून जीवितावरही
छाप तुझी गंध तुझा
माझ्या बागच्या सर्व फुलांना
तुझे मंतरलेले रंग आले
हद्द सरहद्द सोडत तोडत
हर श्वास माझा तुझा झाला
पण तू माघारा गेल्यापासून
अश्रू थिजून वेडे झाले
- आशिष भोजने
Comentários