शब्द माझा पाखरू झालाय
तुझ्या डोळ्यांचं आसमंत दे
लपाछपीची ती भेट नको
एकच आयुष्य अनंत दे
हृदयकोंदणी जीवासंगे
शब्द जपण्याची शक्ती आहे
नाव तुझं कोरून तिथेशी
जगण्याचा नवा मंत्रही दे
जीवा-काळजा खाली माझीया
टुमदार एक घर बांधलंय
अंगणात झुल्यावर सदा
तुला झुलवण्याचा छंद दे
इवल्याशा डोळ्यात नांदती
इव-इवलीशी स्वप्ने माझी
साकारण्या तुझा हात हवा
तुझ्या साथीचा तो वसंत दे
- आशिष भोजने
Comments